marathi sad love story msg|romantic love stories in marathi

marathi sad love story msg|romantic love stories in marathi
ति आणि तो।
वेळ संध्याकाळचि पाच चि होति,मुलिला घेण्यासाठि शाळेच्या गेट वर थांबलो होतो,शाळा तसि सव्वा चार लाच संपायचि खरंतर मि तिथं पाउन घंटा अगोदरच येऊन थांबायला हवं होतं पण कामाच्या गडबडीत थोडा उशिरचं झाला,तेवढयात फोन वाजला,फोन बायकोचा होता विचारंलं अरे अभि कुठेस मि म्हंटल अग मुलिला घ्यायला आलोय शाळेत आहे तिच्या तेव्हा ति म्हंटलि अरे बाबा कडे जायचं होतं म्हणुन दुपारिच तिला शाळेतुन घेउन आले तुला सांगायचं राहुनच गेल,बरे ते पेपर्स शालिनि कडे आहेत त्यावर sign कर आज मग उदया भेटुतंच ok,मि ठिक आहे म्हंटल आणि फोन ठेवला,थोडा रिमझिम पाऊस पडु लागला होता सिगारेट चि तलप लागलि म्हणुन पावसा पासुन थोडा अडोसा घेतला,खिश्यातुन सिगारेट काढलि ति पेटवणार तेवढयात मागुन एक आवाज आला काय रे सिग्रेट कधि पासुन चालु केलिस?सिग्रेट पेटवण्यासाठी उजव्या हातात धरलेलि ति जळणारी काडी आणि ति विजु नये म्हणुन डाव्या हाताचा तिला घातलेला घेरा एकाच जागि थांबला त्या पेटलेल्या काडीवर खिळलेलि नजर आलेला आवाज कोणाचा याचा अंदाज घेत होति,आवाज ओळखितला होता पण गेल्या पंधरा वर्षांत न एकलेला,हातातलि काडि खालि फेकलि, थोड्या अश्चर्यानं आणि चेहऱ्यावर न आलेल्या पण मनात असलेल्या आनंदान तडकाफडकी मागे पाहिलं आणि काळजाचा ठोका एकदम रुकला गेल्या पंधरा वर्षांत मनात एक आठवण म्हणुन साठवुन राहिलेलि ति आकृति एकदम समोर आलि रोज मना मध्ये येणारि,तिच डोळ्यातिल चमक,तेच ओठांवरचं हास्य,तिचं गालावरचि लालि,केस जास्त मोठे हि नाहि आणि फार लहान हि नाहि खांदयापेक्षा थोडेसे खालि आलेले अगदि मला जसे आवडायचे तसेच,इतक्या वेळा पासुन न पेटवलेलि ति सिग्रेट तसिच दोन ओठांमध्ये दाबलेलि होति,तिने एक पाऊल पुढे टाकुन सिग्रेट स्वतःच्या हातात घेऊन माझ्या ओठांमधुन त्या सिगारेट चि सुटका केलि,सिगारेट स्वतःच्या हातात दाबुन "कायरे घाबरलास का अजुनहि भित्राचं आहेस रे",
ति:-अरे बोल काहितरी
मि:-नाहि,घाबरलो नाहि,अनपेक्षितपणे तु समोर दिसलिस म्हणुन थोड अश्चर्य वाटलं
ति:-हो का
मि:-तु इंथ?कसकाय?मि तुला ओळखु आलो?मि लक्षात आहे तुझ्या?
ति:-अरे हो हो किति प्रश्न एकदम,सर्व काहि सांगते चल कुठ तरी बसुत पहिले जिथं आपल्याला शांतपणाहि भेटेल तुला चहा भेटेल आणि मला कॉफि,इथं जवळचं एक जागा आहे मला माहित आहे चल तिथे जाऊत
मि एकटक तिच्याकडे बघु लागलो,वाटल हे काहि खरं नाहि,स्वप्नं असेल कदाचित नेहमिसारखं,हे सर्व विचार होत असतानाचं गालावर हलकेसे दोन थाप पडले!
ति:-काय रे कुठ हरवलास? चलतोयेस ना.
मि तिच्याकडे बघितलं आणि होकारार्थि डोकं हालवल,तिनंहि थोडं हसत माझ्यासारखि नकल करत डोकं हालवल आणि मला वेडा म्हणुन चालायला लागलि,मि हि तिच्या पाठमोऱ्या आकृति कड़े बघत तिच्या मागे निघालो।
थोड्याचं अंतरावर असलेल्या AG cafe वर बसलोत,आम्हि बसताचं एक वेटर बाजुला येऊन थांबला,तिनं लगेच order दिलि एक कॅपेचिनो आणि एक निखळ दुधाचा चहा त्यात तिन चमचे साखर आणि थोडं आद्रक thank you,
ति:-(नेहमिप्रमाणे थोड हसत)असाचं आवडतोन तुला चहा
मि:-लक्षात आहे तुझ्या
तिनं थोड हसत पहिल्याप्रमाण फक्त तिचि मान डोलावलि।
मि:-बरं cafe मध्ये आपण असा सांगितल्या प्रमाण चहा देतात
ति:-सहसा नाहि पण ह्या cafe वाले मला ओळखतात एकतात माझं सांगितलेलं,बरं ते जाऊदे काय म्हणतात तुझि मुलगि आणि बायको
मि:-काहि नाहि सर्व काहि मज्जेत,मुलगि सध्या तिसरीत आ...एक मिनिट तुला कसकाय माहित मला मुलगि आहे ते(मि थोड अश्चर्यानिचं विचारंल)
ति:-अरे काहि नाहि मि तुझ्या मागे detective लावला होता तुझि माहिति काढण्यासाठि
चेहऱ्यावर कसलेहि हावभाव न आनता तिनं हे वाक्य म्हंटल होत,माझ्या कपाळावर एकदम आठया पडल्या काय बोलावं हेच मला समझलं नाहि
ति:-(एकदम मोठयाने हासुन)अरे किति serious झालास तु,आता गाडि पसे जेव्हा फोन वर बोलत होतास तेव्हा तिथेचं तुझ्या माघे उभा होते मि तेव्हा एकल,तुला काय वाटलं खरंच तुझि हेरगिरी करत होते काय,वेडा रे वेडा
अस म्हणुन पुन्हा एकदा मोठयाने हसलि,भलेहि माझि गम्मत झालि होति पण इतकया वर्षानि पुन्हा एकदा तिला एवढया मोकळे पणाने हसताना पाहिल होत,मनाला त्यातंच बरं वाटलं।
ति:-बरं काय नावं आहे मुलिचं
मि:-गा....
वेटर:-mam here is your order one capachino and one tea with three spoons of sugars and some garlic
ति:-Thank you,so tell me abhi what are you doing now
मि:-nothing much,जैसि थि पंधराह साल पहले वैसिहि है बस कुछ लोग छोड गये कुछ लोग साथ आये
तिच्या चेहरा एकदम हिरमुसला, मला थोड वाईट वाटल म्हणुन थोडा विषय change करण्यासाठी मिच विचारंल
मि:-बाकि काहि,मुलगा वगैरे
ति:-हो आहे ना,पहिलित आहे सध्या
मि:-आणि mister काय करतात
ति:-लग्न नाहि केलं मि....
मि थोड्या नाराजिनं आणि थोडं गोंधळ्यानंच कसं विचारु लक्षात नाहि आलं पण मि घाबरुण विचारलंच
मि:-चुकिचं नको समजुस पण लग्न नाहि केलस आणि मुलगा
ति:-अरे adopt केलाय,i am a single mom,i am taking care of him on my own.
तस तिच्या छोटया छोट्या गोष्टि चा मला नेहमिचं अभिमान वाटायचा आणि ही गोष्ट तर नक्किच अभिमानास्पद होति,माझ्या चेहऱ्यावर हळुच हास्य आलं आणि मला तिचा अभिमान आहे हे तिनं त्यातंच टिपलं
ति:-बरं इतक्या वर्षानि आपन भेटलो तुला मि लक्षात कसकाय आले
मि:-लक्षात ति गोष्ट करावि लागते जि आपण विसरलेले असतो,तुला मि कधि विसरलो होतो हे मला आठवत नाहि!
ति:-साहेबांच कविता करण्याचं वेड आहे म्हणा कि अजुन कॉफि चा सिप घेत ति म्हणालि,मि फक्त्त एक smile दिलि
ति:-आठवतं का माझ्या वर केलेल्या कवितानि आणि शायरींनी दोन तिन रजिस्टर भरवले होतेस
मि:-लक्षात आहे तुझ्या
ति:-लक्षात ति गोष्ट करावि लागते जि आपण विसरलेले असतोत
मि फक्त तिच्या कडे एकदा बघितल,एका घोटात चहा पिला आणि म्हंटलो चल निघावं लागल मला आणि मि खुर्चितुन उठलो तसि ति हि उठलि आणि माझा हात घट्ट पकडला आणि म्हणालि थांब ना रे अभि आताच तर भेटलोयेत इतक्या वर्षानि थोडा वेळ थांब अजुन। बरंच काहि बोलायचय तुझ्याशि,
मि:-काय बोलणार आहेस गायत्रि,जेंव्हा बोलायला पाहिजे होतसं तेव्हा नाहि बोलिस,काहिहि न सांगता एकदम निघुन गेलिस,कविते मध्ये लिहिलेल्या प्रत्येक शब्दा मधुन मि तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करायचो कधिहि तुझ्याकडुन प्रेमाचि अपेक्षा केलि नाहि,जाण्याच्या आधि "मि चालिए" फक्त एवढंच म्हणालि असतिस ना तरि पुरे होत, जगलो असतो बिना ओझ्या चं,विचारलहि नसतं कुठे जात आहेस,फकत एकदा सांग़ायचं होतस,तु गेल्यानंतर पुढंच एक वर्ष रोज यायचो तुझ्या घरा समोर कदाचित येशिल वापस म्हणुन,दिवस रात्र फोन बघायचो कदाचित करशिन एखादा फोन एखादा मेसेज,दररोज टपालात जाऊन विचारायचो माझ्या नावाच एखादं पत्र आलंय का,लिहिल असशिल एखाद पत्र म्हणुन,
वाट बघत बसायचो वाटायचं येईल कधितरी तुला माझि आठवण म्हणुन,नंतर जाळुन टाकल्या तुझ्यावर लिहिलेल्या कविता पण मनात्तुन कुरतडत राहिलो स्वतःला आठवणि नाहि जाळु शकलो म्हणुन आणि तु आज भेटतियेस पंधरा वर्षानि .......
गायत्रि:-कोण म्हंटल रे तुला माझं तुझ्यावर प्रेम नव्हत,त्या वेळेस चि परिस्थिति अशि होति मला पाहिजे असुन हि तुला सांगता आलं नाहि ,तु एकवलेल्या कवितेचा शब्दना शब्द मनात साठवुन ठेवायचे मि,तु भलेहि जाळल्या असशिल कविता, मि तु एकवलेल्या कविता रोज घरी जाऊन माझ्या वहित लिहुन ठेवायचे,कित्येक पत्र लिहिलि मि पण कधि तुला पाठवण्याचि हिम्मतच नाहि झालि,
हे सर्व बोलुन काहिच फायदा नाहि गायत्रि "मि विसरलोय तुला आता"
मि पुढे काहि बोलणार एवढयात मागुन हाक आलि अरे अभि इथ काय करतोयस,मि माघे बघितल तर ति अश्विनि होति,अश्विनि माझ्या जवळ आलि,अरे कीति फोऩ केले तुला फोन switch off येतोय,अगं battery dead झालि असेल,मि म्हंटल,
ह्या कोण?अश्विनि ने विचारल
मि:-oh sorry,ह्या miss गायत्रि बऱ्याच वर्षानि भेटल्या आज and गायत्रि meet my wife ashwini
गायत्रि च्या चेहऱ्यावर आलेले आश्चर्याचे आणि नाराजि चे भाव माझ्या लक्षात आले
अश्विनि:-oh nice to meet you,but now i have to go sorry
बरं एकना अभि advocate shallini  कडे आपले divorce  चे पेपर्स रेडी आहेत मि sign केलिए तु ही करुन घे bye आणि हा "गायत्रि" बाबां सोबत आहे जाता जाता तिलाहि भेटुन जा,असं म्हणुन अश्विनि तिथुन निघुन गेलि
गायत्रि माझ्या कडे आश्चर्यानि पाहात होति,मि पुरता गोंधळलो आणि तडकाफडकि तिथुन निघायच बघायला लागलो
गायत्रि:-अभि थांब,काय म्हणला होतास तु की तु मला विसरलाएस
मि:-हो मि तुला विसरलोय
गायत्रि:-मुलिचं नाव गायत्रिचं ठेवलएस खरंच मला विसरलास
मला काय बोलाव तेच समजल नाहि कारण ति जे म्हणत होत्ति ते खर होत,हो आणि मुलिचं नाव देखिल मि तिच्याच नावावरुन ठेवल होत
गायत्रि:-तुला माहिति या cafe मधले लोक माझ का एकतात कारण हो cafe माझा आहे AG cafe ..........Abhi gayatri cafe
to be continued





Comments

  1. 1XBET - Betting Sites of the Day | Football - Xn--o80b910a26eepc81il5g.online
    1XBET - Betting Sites of the Day | Football · 1XBET - Betting Sites of the Day · 1XBET - Betting Sites of the Day · 1XBET - Betting Sites of the 1XBET Day · 1XBET 우리카지노 - Betting Sites of the Day · 1XBET - fun88 vin Betting Sites of

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Instagram,whatsapp everyone is getting this wrong puzzle challenges with answers

Marathi Whatsapp guess the marathi song puzzle question answer